आंबट-गोड चटण्या – टोमॅटो, चिंच, कवठ यांसारख्या चटण्यांमध्ये गूळ असतो, जो आपण आवडीने खातो.
लोणची – जेवणाची मजा वाढवणारी लोणची पचनासाठी चांगली असतात, पण बाजारातील लोणच्यांत जास्त तेल, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात.
बाहेरचे ड्रिंक्स – हेल्दी वाटणारी पण जास्त कॅलरी असलेली सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूस वजन वाढवू शकतात.
ताक-दही – आरोग्यासाठी चांगले पण त्यात जास्त साखर किंवा मीठ टाकल्याने फायदे कमी होतात.
पुरी-पराठे – हे चविष्ट असले तरी त्यातलं जास्त तेल किंवा तूप आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.