ड्रॅगन या फळाचे असंख्य फायदे आहेत. परंतु त्याचे तोटे तुम्हाला माहिती आहेत का?
काहींसाठी ड्रॅगन फ्रूट ऍलर्जीक समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते.काही लोकांना ड्रॅगन खाण्यामुळे खाज सुटणे, सूज, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी किंवा आणखी गंभीर लक्षणे जाणवू शकतात. ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे. त्यांनी ड्रॅगन फळ खाताना काळजी घ्यावी.
ड्रॅगन फ्रूटचे जास्त सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. अतिसार, पोटदुखी, किंवा संवेदनाक्षम व्यक्तींमध्ये सूज येणे असे प्रकार होऊ शकतात.
उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या आजारांवर औषधोपचार करणाऱ्यांनी ड्रॅगन फळाचा समावेश करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ड्रॅगन फळाचे सेवन त्यांच्यासाठी हानी पोहोचवणारे असू शकते. ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक साखर असली तरी, ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी याचे सेवन प्रमाणात करावे.
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी ड्रॅगन फ्रूट माफक प्रमाणात सेवन करावे. त्यात ऑक्सॅलेट्स असतात. जे किडनी स्टोन तयार होण्यास हातभार लावू शकतात. त्यामुळे किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी ड्रॅगन फळाचे सेवन करणे टाळावे.
ड्रॅगन फ्रूट पोषणतत्त्वांनी समृद्ध असले तरी, ते फळ इतर फळांच्या तुलनेत कमी प्रमाणात पोषणतत्त्व प्रदान करते.