Fri. Jun 21st, 2019

डहाणूत जखमी कासवावर फिजिओथेरेपी

0Shares

वसई येथे 1 ऑगस्ट 2018 रोजी सापडलेल्या बच्चू नामक ऑलिव रिडले प्रजातीचा कासवावर डहाणू कासव पुनर्वसन शुश्रूषा केंद्रामध्ये फिजीओ थेरेपी देऊन उपचार करण्यात आले.

या कासवाचा एक पाय हालचाल करत नव्हता, अश्या वेळी पालघर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आणी W.C.A.W.A.संस्थेचे संस्थापक श्री.धवल कंसारा, W.C.A.W.A.चे सदस्य वेटर्नरी डॉ.श्री.दिनेश विन्हेंरकर यांनी त्या कासवाची फिजीयो थेरिपी करण्याचे ठरविले.

फिजीयो थेरिपी करण्यात आलेले कासव आता उत्तम रित्या पोहत आहे, समुद्री कासवाला फिजीयो थेरिपी देण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे.

डहाणू येथील कासव पुनर्वसन आणी शुश्रूषा केंद्रात 2 महीने उत्तम रित्या उपचार घेऊन बरे झालेले आहे आणि आता चांगल्या प्रकारे पोहणाऱ्या या ऑलिव रिडले जातीच्या कासवाला माइक्रो चिप लावून काही दिवसात समुद्रात सोडण्यात येणार आहे. 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: