Sun. Jun 20th, 2021

जेव्हा विमानात कबुतरं उडतात…

अहमदाबादहून जयपूरला आलेल्या विमानात दोन अगंतुक प्रवासी शिरले आणि त्यामुळे मोठाच गोंधळ उडाला. पण हे प्रवासी होती दोन कबुतरं. ‘गो एअर’ (Go Air) च्या विमानात कबुतरं शिरल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांना बाहेर पळवण्याचं काम करावं लागलं. सुदैवाने त्यावेळी विमान उड्डाण सुरू झालेलं नव्हतं.

Go-Air च्या 8-702 या विमानात एका प्रवाशाने आपली बॅग ठेवण्यासाठी विमानातील लगेज शेल्फ उघडलं आणि त्यातून चक्का 2 कबुतरं उडत बाहेर पडली. ही गोंधळून गेलेली कबुतरं बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. अचानक कबुतरांच्या फफडण्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी तर कबुतरांना पकडण्याचाही प्रयत्न केला. अखेर क्रू मेंबर्सने विमानाचा दरवाजा उघडून कबुतरांना मुक्त केलं. हा सर्व घटनाक्रम काही प्रवाशांनी शूट केला. तो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात लोक गमतीदार आरोळ्या देतानाही दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *