Jaimaharashtra news

महापौरांच्या कारला धक्का देण्याची वेळ

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यावर आज अनोखं दृश्य पाहायला मिळाले. पिंपरी महापालिकेच्या महापौरांच्याच गाडीला धक्का मारण्याची वेळ ओढावली होती.

 

महापौर नितीन काळजे यांची सरकारी कार रस्त्यातच बंद पडली. मग काय रस्त्यात जो भेटला त्याला धक्का मारण्याची विनंती करण्यात आली.

 

कारमध्ये बसलेला ड्रायव्हर आणि पाठीमागे धक्का मारणारे सर्वसामान्य असंच चित्र यावेळी दिसत होतं. अखेर धक्का मारून ही कार इच्छित स्थळी पोहोचवण्यात आली.

 

सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी चिंचवडचं नाव आवर्जून घेतलं जाते. पण महापौरांचीच गाडी बंद पडल्यानं आता महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण

झाले. अनेक वेळा सांगूनही मोटार दुरुस्त केली जात नाही असं सांगत महापौरांनीही नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version