Fri. May 7th, 2021

धक्कादायक! पिंपरीत हॉटेलसमोर लघुशंका केली म्हणून तरुणाची ह’त्या

हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचे अपहरण करून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून करण्यात आला.

हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचे अपहरण करून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली.हितेश मुलचंदानी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार इसमांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरीत हॉटेलसमोर लघुशंका केल्याच्या वादावरून हितेश मूलचंदानीची हत्या झाली होती. सोमवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.

कासारवाडी येथील हॉटेलमध्ये हा बिलाचा वाद झाला, त्यानंतर हितेशच्या मित्राने हॉटेलसमोर लघुशंका केली. हितेश मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता.

हितेशच्या मित्रांचे पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले.

हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याच्या मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत कुणाल हॉटेल गाठले.

हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले.

चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *