Jaimaharashtra news

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, प्रवासी महिलेचे दागिने केले परत

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी-चिंचवडच्या एका रिक्षाचालकानं आजच्या जगातही प्रामाणिकपणा शिल्लक हे दाखवून दिलं. वसीम शेख या रिक्षाचालकानं महिला प्रवाशाचे दागिने परत केले.

 

शेलारवाडीतील शेतकरी महिला आपल्या वडिलांसोबत विकास नगरात एका रिक्षात बसली. देहूरोड रेल्वे स्टेशनवर ती उतरली. मात्र, तिच्याजवळ असलेल्या 4 पिशव्यांपैकी एक पिशवी ती रिक्षातच विसरली.

 

त्या पिशवीत तिच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेले तब्बल 2 ते अडीच लाख रुपये किमतीचे दागिने होते. तिच्या लक्षात आलं तोपर्यंत रिक्षाचालक निघून गेला होता. त्यामुळे तिनं त्याचा शोध सुरू केला.

 

तर दुसरीकडे महिला पिशवी विसरल्याचं रिक्षाचालक वसीमला कळलं, तेव्हा त्यानंही त्या महिलेचा शोध सुरू केला. दोघंही एकमेकांना वृंदावन चौकात भेटले. रिक्षाचालकानं महिलेला तिचे दागिने सुपूर्द केले. त्याच्या या प्रामाणिकपणाचं सर्वांनीच कौतुक केलं.

Exit mobile version