Fri. May 7th, 2021

डोंबिवलीत हिरव्या पावसानंतर आता गुलाबी रस्ते!

रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत आज चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली MIDC मध्ये अनेक रासायनिक कंपन्या आहेत. यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा तसंच ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर आता केमिकलमुळे MIDC चा संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे.

हाच रंग अजून काही रस्त्यांवर दिसत आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल असल्याचंही दिसून आलं आहे.

या केमिकल मुळे मोठ्या प्रमाणात उग्र दर्प सुटला आहे. तसंच परिसरातील लोकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास होऊ लागल्याची तक्रारही स्थानिकांनी केली आहे.

‘MIDC विभागात रस्त्याचे काम सुरू आहे. एका गटाराचं काम चालू होतं. त्यावेळी बंद असलेल्या कारखान्याच्या सांडपाण्याच्या लाइन खोदताना हा केमिकल कचरा बाहेर आला.’ असं या कामाबद्दल अध्यक्ष देवेन सोनी यांनी म्हटलंय. मात्र डोळे चुरचुरण्याच्या तक्रारीबद्दलचे आरोप त्यांनी मान्य केले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *