Mon. May 17th, 2021

अंबरनाथमध्ये खड्ड्यांभोवती काढल्या रांगोळ्या

अंबरनाथ : शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी अंबरनाथकरांनी आज अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं आहे.

अंबरनाथ शहराच्या बारकूपाडा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्यानं नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे आज नागरिकांनी एकत्र येत या खड्ड्यांच्या भोवताली रांगोळी काढली आणि स्वाक्षरी मोहीम राबवली.

याद्वारे नगरपालिका प्रशासनाचं या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. १५ दिवसात खड्डे बुजवले नाहीत, तर पुढचं आंदोलन नगरपालिकेत करणार असल्याचा इशारा, नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *