Sun. May 9th, 2021

#Budget2019 : 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, बजेटमध्ये मध्यमवर्गाला मोठा दिलासा!

मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोएल आज म्हणजेच शुक्रवारी मांडणार आहेत.

या अंतरिम अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांना काही कर सवलती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देऊ शकते, असेही मानले जात आहे.

या अर्थसंकल्पाबाबत प्राप्तिकरात सूट देण्याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मध्यमवर्ग व शेतकरी वर्गासाठी काही विशेष घोषणा होण्याची शक्यता आहे.

मात्र यंदा अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर होण्याची शक्यता दिसत नाही.

Budget 2019 Live Updates:

2020 पर्यंत प्रत्येकाला घर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार – पियूष गोयल

भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था – पियूष गोयल

जीएसटी लागू करणं सरकारसाठी मोठं पाऊल – पियूष गोयल

यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा बोजा वाढला – पियूष गोयल

गेल्या 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात एफडीआय – पीयूष गोयल

सध्या भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती – पीयूष गोयल

स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची तरतूद – पीयूष गोयल

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दरवर्षी 75,000 कोटी रुपयांची तरतूद – पीयूष गोयल

लहान शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपयांची मदत – पीयूष गोयल

सरकारनं बँकिंग क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टी बंद केल्या – पियूष गोयल

5 हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक महिना 500 रुपये देणार – पीयूष गोयल

2 हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये होणार – पीयूष गोयल

21 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना बोनस मिळणार – पीयूष गोयल

ग्रॅच्युईटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांवर – पीयूष गोयल

पशुपालन आणि मत्स्यपालनसाठीच्या कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट – पीयूष गोयल

ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचा मोठा विकास – पीयूष गोयल

निवृत्त सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ – पीयूष गोयल

वन रॅक वन पेन्शन योजना लागू – पीयूष गोयल

नैसर्गिक आपत्तीनं बाधित कर्जाच्या व्याजात 5 टक्के सूट – पीयूष गोयल

गेल्या 4 वर्षांत 34 कोटी जनधन खाती सुरू झाली – पीयूष गोयल

5 वर्षांत करसंकलन जवळपास दुप्पट – पीयूष गोयल

उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना मोफत एलपीजी – पीयूष गोयल

गेल्या 5 वर्षांत सौरऊर्जेत 10 पट वाढ – पीयूष गोयल

40 लाखांपर्यंतचा वार्षिक टर्नओव्हर असणाऱ्यांना GST नाही – पीयूष गोयल

घर खरेदीवरील GST कमी करण्याचा सरकारचा विचार – पीयूष गोयल

आयकर परतावा भरल्यास 24 तासांत रिफंड मिळणार – पीयूष गोयल

रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद – पीयूष गोयल

लष्करी बजेट 3 लाख कोटींवर –  पीयूष गोयल

जवानांच्या पगारात वाढ होणार –  पीयूष गोयल

पुढील 5 वर्षात 1 लाख डिजिटल गावं निर्माण करणार – पीयूष गोयल

5 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करणार – पीयूष गोयल

आयकर मर्यादा अडीच लाखांवरून 5 लाखांवर – पीयूष गोयल

5 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही – पीयूष गोयल

योग्य गुंतवणूक केल्यास साडे सहा लाखांपर्यतचं उत्पन्न करमुक्त – पीयूष गोयल

40 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजाला टॅक्स नाही – पीयूष गोयल

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *