Tue. Jun 18th, 2019

नांदेडचे खासदार लोकसभेत न दिसता हायकमांडला पैसे देण्यातच व्यस्त – पियूष गोयल

178Shares

लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांने प्रचाराचा जार वाढवला आहे.या दरम्यान एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी वाढत आहेत. नांदेडचे खासदार ना लोकसभेत दिसले ना विकासकामासाठी मला भेटले ते फक्त हायकमांडला पैसे पुरवण्यातच व्यस्त राहिले, यावरून त्यांना या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचे स्पष्ट होते असा आरोप पियूष गोयल यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केले आहेत. ते नांदेडमधील धर्माबाद याठिकाणी झालेल्या प्रचारसभेत बोलत आहेत.

पियुष गोयल यांचा अशोक चव्हाणांवर निशाणा

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा जोर वाढला आहे.

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे भाजपाने प्रचारसभेचं आयोजन केलं होतं.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे.

नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मागील ५ वर्षात कधीही आपल्याला भेटायला आले नाहीत.

नांदेडचे खासदार ना लोकसभेत दिसले ना विकासकामांसाठी मला भेटले हायकमांडला पैसे पुरवण्यातच व्यस्त राहिले.

अशी टीका करत पियूष गोयल यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

यावरून त्यांना या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचे स्पष्ट होते असे ही ते यावेळी म्हणालेत.

आदर्श खासदार हे घोटाळे करून हायकमांडला पैसे देण्यात सगळ विसरून गेले असा गंभीर आरोपही गोयल यांनी केला.

178Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *