Wed. Jun 23rd, 2021

भाईंदरच्या ‘इटालियन पिझ्झा शॉप’ मध्ये स्फोट

भाईंदर पश्चिमेला एका शॉपमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

भाईंदर पश्चिमेतील मॅकस्सी मॉल येथे असलेल्या इटालियन पिझ्झा शॉपमध्ये स्फोट झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली.

या स्फोटामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पंरतु यामध्ये या शॉपचं मोठ्या प्रमाणात आर्थिर नुकसान झालं आहे. तसेच या शॉपच्या शेजारील दुकानांचही नुकसान झालंय.

हा स्फोटाची तीव्रता इतका होती की, दुकानातील वस्तु बाहेर फेकल्या गेल्या.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन दलानी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *