चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या आवारात उगवली चक्क गांजाची झाडं!

चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात चक्क गांजाची झाडं उगवली आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरवर चक्क गांजाची रोपं उगवली आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून ही झाडं आता चर्चेचा विषय बनली आहेत.

जळगाव जिल्ह्यात आणि विशेष करून चाळीसगाव तालुक्यामध्ये गौण खनिज आणि वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते.

या अवैध वाळू आणि गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करत अनेकवेळा ही वाहने जप्त केली जातात आणि तहसील कार्यालयामध्ये पडून असतात.

असंच अनेक दिवसांपासून एक ट्रॅक्टर चाळीसगावच्या तहसील कार्यालयामध्ये पडून आहे.

मात्र आता त्या ट्रॅक्टरव चक्क गांजाची झाडं उगवली आहेत.

गांजाची झाडं तिथे कशी उगवली असा प्रश्न आहे.

त्यामुळेच वाळूच्या तस्करीबरोबरच गांजाची सुद्धा तस्करी केली जात असावी, असा संशय निर्माण झालाय.

Exit mobile version