वाईन शॉप २ तास सुरु ठेवा, मुख्यमंत्र्यांकडे विनंती

देशात कोरोनामुळे संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २४ मार्चला संपूर्ण देश लॉकडाऊन करुन घेणार असल्याचं सांगितलं.
या संचारबंदीमुळे तळीरामांची चांगलीच गैरसोय झाली आहे. मात्र दिवसातून केवळ २ तास वाईन शॉप सुरु ठेवा, अशी मागणी किरण कांबळे उर्फ डॉक्टर केके यांनी केली आहे. या मागणीचा व्हिडिओ ब्रिजमोहन पाटील यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.
काय म्हटलंय व्हिडिओत ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब नमस्कार. मी दारु पिणारा आहे. मागील काही महिन्यांपूर्वी मुक्तांगण नशा मुक्ती केंद्रात दारु सोडवण्यासाठी उपचार घेतले होते. औषधं घेतली, पण याचा काहीही उपयोग झाला नाही.
मी दारु पितो. मला दररोज लागतीच. कमीतकमी १ क्वार्टर तरी लागतीच. जी कॉर्टर आमच्या भागात १५० रुपयाला मिळते.
दु:ख इतकचं वाटतं की. जी क्वार्टर ३५०-४०० रुपयाला विकली जात आहे. याचं फार वाईट वाटतंय. आमची सर्व गर्दी, माझ्या ओळखीतले रस्त्यावर उतरायला लागले आहेत.
सांगायचा मुद्दा एवढाच की, राज्यातील तसेच प्रत्येक जिल्ह्यातील वाईन शॉप फक्त २ तासांसाठी सुरु ठेवा. यादरम्यान दारु पिणारे दारु घेतील, दारु पितील, आणि शांत झोपतील. यामुळे लोकं रस्त्यावर उतरणार नाहीत.
मी आज दारुसाठी दारोदार दीड तास फिरलो. मला एक क्वार्टर मिळाली. मी अडीचशे रुपयांची क्वार्टर साडे तीनशे रुपयाला आणली.
उद्धव साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सहकार्य करा, सकाळी किंवा संध्याकाळी २ तास वाईन शॉप सुरु ठेवा, अशी विनंती या पठ्ठ्याने केली आहे.