Jaimaharashtra news

प्लस इंडियाच्या गुंतवणूकदारांचे पैसे थकले, एजंटनं गळफास घेऊन केली आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

पल्स इंडिया कंपनीच्या घोटाळ्यात पहिला बळी गेला. पल्स इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या खातेदारांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमधील एका एजंटने गळफास लावून आत्महत्या केली.

 

राजकुमार पांडुरंग बाबर असं या एजंटचं नाव आहे. बाबर गेल्या अनेक वर्षापासून पल्स इंडिया कंपनीमध्ये काम करत होते. त्यांच्यामार्फत खातेदारांनी जवळपास 6 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीमध्ये केली होती. मात्र, सरकारनं या कंपनीवर कारवाई केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.

 

कंपनीकडून पैसे परत न मिळाल्याने खातेदारांनी या पैशासाठी बाबर यांच्याकडे तगादा लावला होता. अखेर मानसिकदृष्ट्या खचलेल्या बाबर यांनी आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, यासंदर्भात माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version