Wed. May 22nd, 2019

#MainBhiChowkidar – निवडणुकीसाठी मोदी आणि शहांचे ट्विटरवर नवीन नाव

133Shares

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौकीदार चोर है’, या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने एक नवीन शक्कल लढवली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले आहे.दरम्यान राहुल गांधी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी ‘मै भी चौकीदार’ म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, नीरव मोदी, विजय माल्ल्याचा फोटो ट्विट केला आहे.

का केला मोदी आणि शाहांनी ट्विटरवरील नावात बदल?

चौकीदार चौर है या राहुल गांधी यांच्या टिकेला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केले आहे.

अमित शहा यांनी देखील ट्विटर अकाऊंटवरील नावात ‘चौकीदार अमित शाह’ असा बदल केला आहे.

भाजपाच्या सर्वच नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार लावले आहे.

#MainBhiChowkidar या हॅशटॅगसह भाजपाचा  व्हिडिओ

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहिम एका व्हिडिओद्वारे सुरु केली आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदींनी #MainBhiChowkidar या हॅशटॅगसह एक व्हिडिओ टि्वट केला आहे.

या व्हिडिओमध्ये एक गाणे असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभामध्ये लोकांसोबत, रणगाडयामध्ये दिसतात.

या गाण्यामध्ये प्रामुख्याने लोक सुद्धा ‘में भी चौकीदार हूँ’ बोलताना दिसतात.

जे कोणी देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मेहनत घेत आहेत ते सुद्धा चौकीदार आहेत.

आज प्रत्येक भारतीय #MainBhiChowkidar म्हणत आहेत.असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे

काँग्रेस आणि भाजपामधील चौकीदारचा वाद प्रचारादरम्यान चांगलाच गाजण्याची शक्याता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *