Fri. Apr 19th, 2019

जम्मू – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग – पंतप्रधान मोदी

183Shares

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूच्या कठुआमध्ये घेतलेल्या सभेत विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी पाच वर्षात केलेल्या कामाचा पाढाही वाचला. पंतप्रधान मोदींनी अब्दुला आणि मुफ्ती परिवारांवरही हल्लाबोल चढवला. तसेच त्यांना राजकारणातून संपवले पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूच्या कठुआमध्ये जाहीर सभा घेतली.

या सभेमध्ये देशाचे दोन तुकडे होऊ देणार नाही असे वक्तव्य केले.

इथे राहणारा नागरिक मूठभर लोकांचा गुलाम नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच इथे राहणारा प्रत्येक जण भारतीय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

अब्दुला आणि मुफ्ती परिवारावर हल्लाबोल केला.

या परिवाराला राजकारणातून संपवले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट मत मांडले.

जम्मू – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.

कॉंग्रेसने देशाचा विश्वास गमवला आहे.

पुन्हा भाजपा निवडून येणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *