Mon. Aug 26th, 2019

मोदींकडून डॉ. अमोल कोल्हे आणि हीना गावित यांचं कौतुक!

0Shares

आपल्या लोकसभेतील पहिल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि हीना गावित यांच्या भाषणाचं कौतुक केलं. पुन्हा सत्तेत आल्यानंतरचं संसदेतील हे मोदींचं पहिलंच भाषण होतं.

डॉ. अमोल कोल्हे आणि हीना गावित यांचं कौतुक

संसदेतील नव्या खासदारांचं मोदी यांनी यावेळी कौतुक केलं.

प्रताप सारंगी, हीना गावित आणि डॉ. अमोल कोल्हे या खासदारांनी ज्या पद्धतीने विषय मांडले, त्यानंतर मी काही बोललो नाही, तरी विषय जनतेपर्यंत पोहोचेल, अशा शब्दांत मोदींनी नव्या खासदारांचं कौतुक केलं.

डॉ. कोल्हे यांची रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा देण्याची मागणी

छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या’ असं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल लोकसभेत मांडलं होतं. गड किल्यांच्या संवर्धनासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या कोल्हेंची ही लोकसभेतील पहिलीच मागणी आहे.

17 व्या शतकात जसे शिवरायांची राजधानी रायगड होती तशीच ती पूर्ववत करून स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे ती जपायला हवी असे डॅा. कोल्हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर म्हणाले होते. निवडून आल्यानंतर लोकसभेत त्यांनी लगेचच किल्ले संवर्धनकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *