Fri. Sep 17th, 2021

गोंदिया सभेत पंतप्रधान मोदींची विरोधंकावर टीका

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात दुसरी प्रचार सभा घेतली. या सभेत मोदींनी अनेक मुद्यांवरून विरोधकांवर घणाघाती टीका केली. शरद पवार कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहे का ? असाही प्रश्न उपस्थित करत पवारांनी यावर उत्तर द्यावे असेही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

आपला आर्शीवाद घेण्यासाठी गोंदियात आलो आहे असं म्हणतं मोदींनी भाषणेला सुरुवात केली.

देशाची जनता ही निवडणूक लढत असल्याचे मोदी म्हणाले.

गोंदियाच्या विकासावर भर देणार असल्याचे मोदींनी आश्वासन दिले.

महामिलाव, वंशवादाला नष्ट करणार.

टॉयलेटपासून सॅटेलाईट पाडण्यापर्यंत काम केले.

कॉंग्रेसने देशाला अस्थिर करण्याचे काम केले.

बालाकोटची घटना अजूनही स्मरणात

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार.

२०१४ साली शेतकरी, युवक सर्वच चिंतेत होते असं मत व्यक्त केले.

शरद पवार कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला.

महाराष्ट्रात हिंसा पसरवणाऱ्या माओवाद्यांचे दिवस भरलेत.

जमिनीपासून अवकाशापर्यंत विकास केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

महाआघाडीने भंडारा – गोंदियामध्ये भ्रष्टाचार केला.

आमच्याकडे मोदी आहेत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात इतिहास घडणार आहे.

सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात जिंकल्या जातील

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *