Sun. Nov 28th, 2021

निवडणूक आयोगाची ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर स्थगिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर अधारित चित्रपट पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी विरोधकांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित होण्यास मंजूरी दिली असून निवडणूक आयोगाने या चित्रपटाला स्थगिती दिली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे.

निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी विरोधकांनी केली होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाला मंजूरी दिली असली तरी निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीनंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला होता.

त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या यावर निर्णय घ्यावा असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *