Tue. Oct 19th, 2021

देश ISRO च्या पाठीशी, पुढील मिशनसाठी शुभेच्छा- मोदी

अवघा देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो चांद्रयान 2 चा चंद्रावर उतरण्याचा क्षण अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला असतानाच नेमका विक्रम लँडरशी संपर्क तुटला. या प्रकल्पावर दिवसरात्र मेहनत करणारे ISRO चे शास्त्रज्ञ यामुळे निराश झाले. हे मिशन यशस्वी होणं कठीण झालं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. ‘देशाला तुमचा अभिमान आहे’, अशा शब्दांत त्यांनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलं.

7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पंतप्रधान मोदी यांनी ISRO सेंटरमधून शास्त्रज्ञांना संबोधित केलं. ‘गेली तीन वर्षे शास्त्रज्ञांनी चांद्रयानवर खडतर मेहनत घेतली आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. सर्व शास्त्रज्ञांनी विज्ञानाची आणि देशाची मोठी सेवा केली आहे. तूम्ही धीर सोडू नका, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञाचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

मोदी यांच्या भाषणातील मुद्दे-

Chandrayan 2 च्या अखेरच्या टप्प्याचा निकाल आपल्या अपेक्षेनुसार नसला, तरी बाकी सर्व प्रवास अतिशय योग्य होता.

विज्ञानात कधी हार होत नाही. प्रयत्न आणि प्रयोग होत असतात.

या मोहिमेशी संबंधित सर्वजण विलक्षण ध्येयाने झपाटलेले होते.

मी कालही म्हटलं होतं, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

सर्व शास्त्रज्ञाचं देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान आहे.

तुमच्या सर्व टीमने या मिशनसाठी खूप मेहनत घेतली आहे.

भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे.

हार मानणं हे ISRO च्या संस्कृतीत नाही.

तुम्ही शास्त्रज्ञ लोण्यावर नव्हे, तर दगडावर रेषा आखणारे लोक आहात.

या संपूर्ण मिशनदरम्यान देशाला अनेक आनंदाचे क्षण लाभले आहेत.

आताही आपलं ऑर्बिटर चंद्राची परिक्रमा करतच आहे.

आता तर चंद्रावर जाण्याचं आपलं स्पप्न आणखी प्रबळ झालं आहे.

तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *