Sun. May 16th, 2021

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ७५ हजार कोटींच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला आहे.

जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उत्तर  प्रदेशातील गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेला सुरवात झाली.

या योजने अंतर्गत 6  हजार रूपयांचा पहिला हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.

2019- 20 च्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

लाभार्थी कोण ?

ज्या शेतकऱ्याची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी ते शेतकऱ्यांना  या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जवळपास 12 कोटी लहाण शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रूपये मिळणार आहेत.

ही रक्कम शेतकऱ्याला तिन हप्त्यात मिळेल.

उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह इतर 14 राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *