पंतप्रधानांकडून कोरोनाचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज (बुधवारी) आभासी पद्धतीने संवाद साधला आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे मोदींनी संवाद साधला असून देशातील कोरोना परिस्थितीविषयी ते बोलत होते. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ‘लस हेच आपलं कवच आहे’ हे मोदींनी नमूद केलं.
देशात पुन्हा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. देशातील दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेऊन नागरिकांना काळजी घेण्याचं त्यांनी आव्हान केलं आहे. कोरोना हे अजूनही आपल्यासाठी आव्हान आहे , कोरोनाच संकट पूर्णपणे टळलेलं नाही तसेच केंद्र आणि राज्याने मिळून लढा देऊया असं आपल्या बैठकीत मोदी म्हणाले आहेत. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इंधनावरील कर कमी करण्याचे मोदींनी आवाहन केले आहे. कोरोनावरील लस हेच आपलं कवच आहे असं सांगत लशीच महत्व पुन्हा एकदा मोदींनी अधोरेखित केलं आहे.
दररोज वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोदींनी ही बैठक घेतली. दरम्यान, या बैठकीनंतर राजकीय प्रतिक्रिया ही उमटल्या आहेत.