Thu. May 6th, 2021

‘ऑक्सिजन टँकच्या गळतीची घटना हृदय पिळवटून टाकणारी’

महाराष्ट्रात नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँकरमधून गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्यामुळे तब्बल २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या रुग्णालयात जवळपास १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संक्रमण चिंताजनक स्थितीत पोहचलेलं असताना या घटनेनं राज्यालाच नाही, तर देशालाही धक्का दिला आहे. याच घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी,तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

‘नाशिकमधील रूग्णालयात झालेल्या ऑक्सिजन टँकच्या गळती ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीनं अस्वस्थ झालोय. या शोकपरिस्थितीत पीडित कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

तर ‘नाशिक शहरातील एका रुग्णालयात ऑक्सिजन गॅसगळती झाल्यानं घडलेल्या दुर्घटनेबद्दल ऐकल्यानंतर व्यथित झालो. या दुर्घटनेत ज्या नागरिकांनी आपले कुटुंबीय गमावले, त्यांच्या कधीही न भरून येणाऱ्या हानीवर तीव्र संवेदना व्यक्त करतो’, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *