Fri. Jan 21st, 2022

#PulwamaTerrorAttack : हल्ल्याचा बदला व्याजासकट घेणार – पंतप्रधान मोदी

हल्ल्याचा बदला व्याजासकट घेणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झाशी येथील जाहिर सभेत म्हटलं आहे. तसेच सैन्याला हल्ल्याचा बदला घेण्याचे स्वातंत्र आहे, असेही यावेळी ते म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली जाहिर सभा घेतली. यावेळी मोदींनी पाकिस्तानवर घणाघाती टीकाही केली.

सभेत मोदी काय म्हणाले ?

ही भूमी वीरांची आहे.

शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.

सैन्याला हल्ल्याचा बदला घेण्याचे स्वातंत्र आहे.

हल्ल्याचं प्रत्युत्तर व्यजासकट देणार

तसेच हल्ला करणाऱ्यांना शिक्षा मिळणाराच असेही मोदी यावेळी म्हणाले.

पाकिस्तानला जागतिक स्तरावर वेगळं केले.

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *