Thu. May 13th, 2021

मोदींची शपथविधीपूर्वी महात्मा गांधी आणि वाजपेयींना आदरांजली तर शहीद जवानांना वंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींनी शपथविधीपूर्वी महात्मा गांधींना आणि अटल बिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळावर आदरांजली वाहिली आहे. तर राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांनाही वंदन केलं आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि गुलाम नबी आझाद उपस्थित राहणार आहे. पण राजकीय हत्या झाल्याच्या भाजपच्या आरोपांमुळे ममता बॅनर्जींचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे.

असा असणार शपथविथी

आज 30 मे रोजी 7 वाजता मोदी शपथ घेणार असून  मोदींसोबतच मंत्रिमंडळातील इतर सदस्यही शपथ घेणार आहे.
नरेंद्र मोदींनी शपथविधीपूर्वी महात्मा गांधींना आणि अटल समाधी स्थळावर आदरांजली वाहिली  आहे.
तसेच राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांनाही वंदन केलं आहे.
 वायू भवन, सैन्य भवन, रेल्वे भवन, डीआरडीओ, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक या कार्यालयांना दु. 2 वाजल्यापासूनच सुट्टी आहे.

शपथविधीला यांची  उपस्थिती

राष्ट्रपती भवनात हा शपथविधी होणार असून सहा हजार लोक उपस्थित राहणार आहे.

शपथविधीमध्ये BIMSTEC समुहातील देशांचे प्रमुख, शांघाय संघटनेचे अध्यक्ष (SCO),

तसेच किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि मॉरिशिअसचे पंतप्रधान उपस्थित आहेत.

एकूण 14 देशांच्या प्रमुखांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहेत.

राहुल गांधी, मनमोहन सिंह, सोनिया गांधी यांसह अनेक नेत्यांची उपस्थिती आहेत.

तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित आहेत.

सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल देखील उपस्थित राहणार  आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *