Thu. Aug 22nd, 2019

वेळेवर येण्याचे, घरून काम न करण्याचे पंतप्रधानांचे मंत्र्याना आदेश

0Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदासाठी शपथ घेतली. मात्र पंतप्रधान मोदी अॅक्शनमध्ये आल्याचे दिसून आले आहे. कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात,याबाबतचे नियम नुकतेच मंत्रिमंडळात त्यांनी जाहीर केले आहेत.

काय आहेत मोदींचे निर्देश ?

बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

त्यांनी त्यांच्या कार्यशीलतेचे उदाहरण देत घरून काम न करण्याचा सल्लाही दिला आहे.

तसेच अधिवेशन काळात कोणताच दौरा न करण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत.

पुढील पाच वर्षांचा अजेंडा तयार करुन कामाची सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे.

तसेच या कामाचा प्रभाव 100 दिवसांमध्ये दिसायला हवा या बाबतचे महत्तवपूर्ण आदेशही त्यांनी दिले.

मोदींची दुसऱ्या कार्यकाळाला नुकतीच सुरूवात झाली असली तरीही त्यांच्या कामाचा धडाका आणि त्याबाबतची शिस्तबद्धता पार पडलेल्या बैठकीच्या निमित्तीने दिसून आली.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *