Wed. Jun 16th, 2021

जनता चौकीदाराला पसंत करते – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मै भी चौकीदार कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतून कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरही चर्चा केली. भारताला भ्रष्टाचार मुक्त केले आहे. तसेच ज्यांनी देशाला लुटले त्यांना पै पै चुकवावे लागेल. भारतीय नागरिक आता पुन्हा एकदा संधी देतील असा विश्वास दाखवला आहे.

बालाकोटची कारवाई मी नाही जवानांनी केली- नरेंद्र मोदी

चौकीदार म्हणून मी जबाबदारी पार पाडणार आहे असे मोदी म्हणाले.

जनतेच्या पैशांवर डल्ला मारू देणार नाही.

देशातला प्रत्येक व्यक्ती चौकीदार आहे.

माझ्यासाठी चौकीदार म्हणजे महात्मा गांधींचे सिद्धांत.

पाकिस्तान दहशतवादी अड्डे लपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ज्या ठिकाणहून दहशतवाद कंट्रोल व्हायचा तिथूनच खेळाला सुरुवात केली.

माझ्यासाठी निवडणूक नाही देश महत्वाचा आहे.

ज्यांनी देशाला लुटलं त्यांना पै पै चुकावावे लागेल –

ज्यांनी ९ हजार कोटी लुटले त्यांच्याकडून १४ हजार कोटी चुकवले आहे.

जगतल्या कुठल्याही कोपऱ्यात असलेली मालमत्ता जप्त होणारच आहे.

भ्रष्टाचारांना जेलच्या दरवाज्यात नेले आहे, २०१९ नंतर जेल मध्ये टाकणार आहे.

अर्थव्यवस्थेत २०१४ अगोदर भारत ११व्या क्रमांकावर, आता ६व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

शास्त्रज्ञांचे मोदींकडून कौतुक

शास्त्रज्ञांच्या कामगिरीमुळे भारत चौथ्या स्थानावर पोहचले आहे.

अमेरिका, रशिया, चीनने डंका वाजवला.

तर मग भारताने डंका का वाजवू नये ? असा प्रश्न उपस्थित केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *