Sun. Jun 16th, 2019

‘वन मिशन, वन डायरेक्शन’ सूत्र घेऊन पुढे जाणार – पंतप्रधान

25Shares

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाने जाहीरनामाला संकल्प पत्र असे नाव दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आणि या जाहीरनाम्याबद्दल भाष्य केले. ‘आमच्या समतीने मेहनत केली आणि जनतेच्या मनातल्या गोष्टी समजून घेतल्या’ असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच या जाहीरनाम्यात तीन मुख्य गोष्टींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवाद, अंत्योदय आणि सुशासन यावर जाहीरनामा आधारित असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

‘वन मिशन, वन डायरेक्शन’ हे सूत्र घेऊन पुढे जाणार – पंतप्रधान मोदी

सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना बनवणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नदीच्या पाण्याचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी योजना आखणार आहे.

मागील सरकारचं आणि आमचं योग्य मूल्याकंन व्हायला हवं असेही त्यांनी म्हटलं आहे.

दुष्काळावरती मात करण्यासाठी वेगळं जलशक्ती मंत्रालय बनवणार आहे.

काही महत्तवाची कामं पूर्ण करण्यासाठी 75 पायऱ्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मच्छिमारांसाठी वेगळं मंत्रालय बनवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

समाजातील प्रत्येक वर्गासाठी काम करणार आहे.

गेल्या पाच वर्षामध्ये स्वच्छतेची चर्चा होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले .

नागरिक आणि विशेषत: गरीबांना सबलीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

25Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *