Tue. Oct 26th, 2021

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन’ ही या वर्षीची मुख्य कल्पना आहे.या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते ‘वर्ष २०२० ते २०२५ मध्ये भारतात इथेनॉल मिश्रण आखणी संदर्भात तज्ञ समितीच्या अहवालाचे अनावरण होईल. भारत सरकार E-20 नोटिफिकेशनद्वारे इंधन कंपन्यांना 1 एप्रिल 2023 पासून 20 टक्के इथेनॉल मिसळलेलया पेट्रोल विक्रीचे,तसेच BIS निर्देशांना अनुसरून अधिक इथेनॉल मिश्रणासाठी E 12 व E 15 निर्देश जारी करणार आहे.

पंतप्रधान पुण्यात तीन ठिकाणी उभारलेल्या E 100 स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प यांचे निर्माते शेतकरी यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *