Tue. Aug 3rd, 2021

पंतप्रधान मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला विरोध, ट्विटरवर ट्रेंड होतोय #GoBackModi      

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुतील मदुराई दौऱ्यावर जात आहेत, येथे ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यासाठी मोदी थोप्पुरला भेट देणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर ट्विटवर ‘गो बॅक मोदी’ #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. हजारो नेटीझन्सकडून ट्विटवरुन मोदींविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.

तामिळनाडूतील मोदींच्या दौऱ्याला काही स्थानिक नागरिक, विरोधी पक्षातील पुढारी आणि डाव्या पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे,  पंतप्रधान मोदींना ट्विटरवरुनच GoBack असे सांगण्यात येत आहे.

गेल्या 12 तासांपासून ट्विटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. थुटुकुंडी येथील पोलिसांचा गोळीबार, गाजा रिलिफ फंड याबाबत मोदींना प्रश्न विचारण्यात येत आहेत.

या ट्रेंडला शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली असून रविवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत 2.50 लाख ट्विपल्सने हा हॅशटॅग ठेऊन मोदींच्या दौऱ्याला आपला विरोध दर्शवला आहे.

यापूर्वीही एप्रिल 2018 मध्ये मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना अशाचा  विरोधाचा सामना मोदींना करावा लागला होता. त्यावेळीही विरोधकर्ते काळे झेंडे घेऊन मोदींविरोधात रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान गो बॅक मोदी हा हॅशटॅग ट्रेंड झाल्यानंतर, मोदी समर्थकांनीही #TNWelcomesModi असा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *