‘चुनाव आया, इसलिये पाय धोया’ – छगन भुजबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगास्नानानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. या गोष्टीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मोदींच्या कुंभमेळयातील उपस्थितीवर आणि असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुण्यावर विरोधकांनी मात्र टीकांचा भडीमार केला आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्याचं दिवशी विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.
त्यामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुंभमेळ्यातल्या उपस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी त्यांच्या टिपिकल स्टाइलमध्ये खोचक टीका केली.
‘निवडणुका जवळ आल्यामुळेच मोदींनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुण्याचा स्टंट केला’, असं म्हणत ‘चुनाव आया, इसलिये पाय धोया’, अशा शब्दात त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
मोदींनी कुंभमेळ्यात काय केलं?
प्रयागरापमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली.
मोदींनी गंगेत डुबकी लावली आणि यानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतले.
मोदींच्या या कृत्याचं भाजपच्या अनेक नेत्यांनी कौतुक केलं तर विरोधकांनी मात्र या मुद्यावरून मोंदींना लक्ष केलं आहे.
सोमवारी विधानभवनाच्या बाहेर विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपवर टीका केली.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
मोदीं गुजरातचे मुख्यमंत्री असताना कुंभ मेळा झाला तेव्हा त्यांनी पाय धुतले नाहीत.
महाराष्ट्रातला कुंभमेळा हा कुंभमेळा नव्हता का? आत्ताच मोदींना पाय का धुवावे लागले?
निवडणुका आल्या आहेत, त्यामुळेच मोदींनी पाय धुण्याचा स्टंट केला आहे.
चुनाव आया इसलिये पाय धोया!’ अशा शब्दात त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.