Mon. Aug 26th, 2019

पंतप्रधान अखंड हिंदुस्तानचं स्वप्न पूर्ण करतील- खा. संजय राऊत

0Shares

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 अंशतः हटवण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडलं. या प्रस्तावावर राज्यसभेत गदारोळ माजला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. सरकारने हा निर्णय घेऊन संविधानाची हत्या केली आहे, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं. शिवसेना, बसपा, आप या पक्षांनी मात्र या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय. शिवसेनेने या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्यसभेत खासदार संजय राऊत यांनी निर्णयाचं स्वागत करताना मोठं विधान केलंय.

काय म्हणाले शिवसेना खासदार संजय राऊत?

आज जम्मू काश्मिर घेतलंय. उद्या, पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानही घेऊ.

पंतप्रधान अखंड हिंदुस्तानाचं स्वप्न पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.

कलम 370 हटविल्यानंतर मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केलाय.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *