Wed. Aug 4th, 2021

‘या’ यादीत मोदींनी बीग बी आणि शाहरुखलाही टाकले मागे

YouGov या ऑनलाइन इंटरनेट आणि डेटा मार्केटिंग कंपनीच्या यादीत मोदी जगातील 6 वे आवडते पुरूष ठरले आहेत. या यादीत मोदींनी अमिताभ, शाहरुख, सलमानलाही मागे टाकले आहे.

YouGov या ऑनलाइन इंटरनेट आणि डेटा मार्केटिंग कंपनीच्या यादीत मोदी जगातील 6 वे आवडते पुरूष ठरले आहेत. या यादीत मोदींनी अमिताभ, शाहरुख, सलमानलाही मागे टाकले आहे. आवडत्या पुरूषांमध्ये मोदी भारतात प्रथम क्रमांकावर आहेत. तर जगात ते सहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीत अमिताभ बच्चन 12 व्या स्थानी शाहरुख खान 16 तर सलमान 18 व्या स्थानी आहे. ऑनलाइन मतदानाच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली येते.

YouGov च्या यादीत मोदी अव्वल स्थानी

YouGov या इंटरनेट आणि डेटा मार्केटिंग कंपनीने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे.

या यादीत आवडत्या पुरूषांमध्ये मोदी भारतात प्रथम स्थानी तर जगात सहाव्या स्थानावर आहेत.

जगातील आवडत्या पुरुषांच्या यादीत बिल गेट्स हे अव्वल स्थानी आहेत. तर बराक ओबामा दोन नंबरला आहे.

टॉप 20 च्या यादीत सचिन तेंडूलकर, विराट कोहलीचा देखील समावेश आहे.

महिलांच्या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा ही एक नंबरला आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण 13 व्या स्थानी असून प्रियांका चोप्राला ही 14 व्या स्थानी आहे.

टॉप 10 आवडते पुरुष

1. बिल गेट्स, 2.बराक ओबामा, 3. जैकी चैन , 4. शी जिनपिंग
5. जॅक मा, 6. नरेंद्र मोदी, 7. रोनाल्डो, 8. दलाई लामा
९. मेसी १०. पुतिन

टॉप 10 आवडत्या महिला

1. मिशेल ओबामा, 2.  ओपेरा विनफ्रे, 3. एंजेलिना जॉली,
4. क्वीन एलिझाबेथ-२, 5.एम्मा वॉटसन , 6. मलाला युसूफझाई
7. पेंग लियुआन, 8. हिलरी क्लिंटन, 9.तू यूयू,   10. टेलर स्विफ्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *