Mon. Dec 6th, 2021

कार्तिकने शेअर केलेल्या ‘बॅकफी’वर पंतप्रधान मोदींनी दिला ‘हा’ भन्नाट रिप्लाय

बॉलिवूडच्या प्रतिनिधी मंडळाने काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अभिनेता अनिल कपूरनेही पंतप्रधानांची भेट घेत याप्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटींची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. त्यातच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकताच भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि कलाकार मंडळींची भेट झाली.

या भेटीमध्ये अनेकांनी पंतप्रधानांसोबत फोटो काढले. मात्र कार्तिकला फोटो काढणे शक्य झाले नाही. त्यानंतर कार्तिकने पंतंप्रधान मोदींसोबत काढलेला ‘बॅकफी’ शेअर करत पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढणे शक्य न झाल्याचे म्हटले. ‘बॅकफी’ हा शब्द याआधी इतका प्रसिद्ध नव्हता मात्र आता पंतप्रधान मोदींमुळे सोशल मीडियावर हा शब्द चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळत आहे. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये कार्तिकसोबत चित्रपट दिग्दर्शक करण जोहर,दिनेश विजान आणि इम्तियाज अली आहेत. या फोटोमध्ये चौघांच्यामागे पंतप्रधान मोदी पाठमोरे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमादरम्यान अभिनेता कार्तिक आर्यनने पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फोटो कढणे कार्तिकला शक्य झाले नाही. त्यानंतर कार्तिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत स्वत:ला लूजर म्हटलं होतं. यावर पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ त्यांची प्रतिक्रिया देत “तुम्ही लूजर्स नाही, तर रॉकस्टार आहात! , असे म्हटले आहे. तसेच पुढे मोदी म्हणाले नो ‘बॅकफी’ जब वी मेट पण पुढे असे अनेक प्रसंग येतील” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये कार्तिकसोबत चित्रपट दिग्दर्शक करण जोहर,दिनेश विजान आणि इम्तियाज अली आहेत. तर फोटोमध्ये चौघांच्यामागे पंतप्रधान मोदी पाठमोरे उभे असल्याचंही पाहायला मिळत आहे.

या फोटोला कार्तिकने ‘माननीय पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या लुजर्सचा बॅकफी’, असे कॅप्शन दिले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कार्तिकला सोशल मीडियावर उत्तर देत पुढच्या वेळी नक्की फोटो काढू असे म्हटले आहे. मोदींनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी कलाकारांशी चित्रपटसृष्टीतील काही मुद्द्यांवरही चर्चा केली. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मोदींसह फोटो काढत हे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *