Jaimaharashtra news

मोदींची प्रियंका गांधींवर टीका “काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो”

काँग्रेसचे सरचिटणीस पद प्रियंका गांधींना देण्यावर PM नरेंद्र मोदींनी तीव्र प्रतिक्रिया दर्शवली आहे. प्रियंका गांधींचे नाव न घेता त्यांना उद्देशून मोदी म्हणालेत की, “काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो.” महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले.

“काही लोकांसाठी परिवारच पक्ष आहे. मात्र आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे.” असं ते यावेळी म्हणाले.

 

 

प्रियंका गांधी

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींना काँग्रेसचे सरचिटणीसपद दिले.

भाजपाच गड असलेल्या उत्तर प्रदेशचे प्रभारीपद ही प्रियंका यांना देण्यात आले आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या कार्यभार स्वीकारतील.

प्रियंका गांधी निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा प्रचार करायच्या.

मात्र त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते.

गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधींकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती.

‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही लावले होते.

तर दुसरीकडे भाजपाने यावर टीका केली.

Exit mobile version