Sun. Oct 17th, 2021

#PMNarendraModiTrailer : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज

आगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक रिलीज होत आहे.

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरविषयी सर्वाधिक उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती.

या बायोपिकमध्ये बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मोदींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.

ओमंग कुमार दिग्दर्शित हा सिनेमा 5 एप्रिलला रिलीज होत आहे.

या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.

एक सामान्य चहा विक्रेता ते सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा पंतप्रधान असा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

या प्रवासात मार्गात येणाऱ्या अडचणी, निर्माण होणारे वाद विवादांचे चक्रव्यूह आणि त्यातूनही मार्ग काढत आपले कर्तव्य निभावणारे मोदी अशा अनेक घटना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

विवेक ओबेरॉयसह बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

हा सिनेमा 23 भाषांमध्ये रिलीज होत आहे. मोदींचा बायोपिक 12 एप्रिल रोजी रिलीज होणार होता मात्र सिनेमाच्या प्रदर्शनावर गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेनं आक्षेप घेतला होता.

निवडणुकांच्या काळात मतदारांना अधिक आकर्षित करून भाजप स्वत:चा फायदा करून घेत आहेत असा आरोप क्राँगेसचा होता.

या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी असे पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आले होते. त्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *