Sun. Oct 17th, 2021

‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिकचे प्रदर्शन लांबणीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर अधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट येत्या ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाचे निर्माते संदिप सिंह यांनी हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार नसल्याची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. तसेच पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चित्रपटाविरोधात दिल्ली तसेच मुंबईत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नेमकं काय घडलं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर अधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

येत्या ५ एप्रिलला म्हणजेच उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

मात्र चित्रपटाचे निर्माते संदिप सिंह यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे म्हटलं आहे.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चित्रपटाविरोधात दिल्ली तसेच मुंबईत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यापूर्वी या चित्रपटाची तारीख बदलण्यात आली.

हा चित्रपट १२ एप्रिल रोजी होणार होता.

मात्र निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तर मतदारांवर, प्रचारावर परिणाम होईल.

तसेच यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

मात्र यावर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सुनावणी दिली असून ही याचिका फेटाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *