Sat. Sep 21st, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘ऑर्डर ऑफ झायेद ‘ पुरस्काराने सन्मानित

0Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी युएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ झायेद ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींनी भारत आणि युएई दरम्यान द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण म्हणून हा पुरस्कार प्रदान केला आहे. यापूर्वी अनेक विदेशी नेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमार पुतिन,  राणी एलिझाबेथ आणि चिनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांचा समावेश आहे.

मोदींना ‘ऑर्डर ऑफ झायेद ‘ पुरस्काराने सन्मानित –

अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी एप्रिल महिन्यात भारताबरोबर असलेल्या संबंधाबद्दल ट्विट केले होते.

भारतबरोबर आमचे ऐतिहासिक संबंध असून या मजबूत संबंधाचे श्रेय माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशामधील संबंधाना मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

भारत आणि युएई मध्ये 60 बिलियन डॉलरचा व्यवसाय होत असल्याचे समजते आहे.

त्याचबरोबर युएई भारताचा तिसरा ट्रेड पार्टनर आहे.

5 ट्रिलियन डॉलर इकॉनोमीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी युएई भारताची मदत करत असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *