Tue. Jul 14th, 2020

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबईच्या कफ परेडला असणाऱ्या या museum मध्ये भारतीय चित्रपटांचा 100 वर्षांचा इतिहास मांडण्यात आलाय. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली हे museum  उभारण्यात आलंय.

द न्यू म्युझियम बिल्डिंग

या इमारतीत 4 दालनं तयार करण्यात आली आहेत.

बालचित्रपट स्टुडिओ, तंत्रज्ञान, भारतीय सिनेमा आणि creativity, गांधीजी आणि सिनेमा असे यात 4 विभाग आहेत.

Museum साठीसेन्सोर बोर्डाचे अध्यक्ष आणि कवी प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ‘Innovation committee’ ही स्थापन करण्यात आली.

दोन इमारतींमध्ये हे संग्रहालय तयार करण्यात आलंय.

‘गुलशन महल’ या इमारतीचा जीर्णोद्धार या museum साठी करण्यात आलाय.

या इमारतीच्या 9 भागांत आहे ‘ही’ माहिती-

सिनेमाचा उदय (Indian Cinema)

मूकपट (An era of Silent films in India)

बोलपटांची सुरूवात (Emergence of talkies in India)

स्टुडिओंचा कालखंड (Period of studios in India)

दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम (Consequences of World War II)

 

 

संबंधित बातम्या- 

#StatueOfUnity Live: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण

शिर्डीनंतर पंतप्रधान मोदींची ‘इथेही’ भेट

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *