Thu. Jan 27th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाराणसी दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या लोकसभा मतदार संघाचा म्हणजेच वाराणसीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान अनेक विकास परियोजनांचं उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या विधासनभा निवडणूक मोहिमेची सुरुवात म्हणून पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. पंतप्रधान मोदी यांचा यंदाच्या वर्षातील आपल्या मतदारसंघात हा पहिलाच दौरा आहे.

पंतप्रधान मोदी बीएचयू कॅम्पसमधील एमसीएच विंगमध्ये १०० खाटा असणाऱ्या एमसीएच विंगचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात ते डॉक्टर आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांबरोबर संवाददेखील साधणार आहेत.

पंतप्रधान ज्या विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत, त्यात बनारस हिंदू विद्यापीठातील १०० बेडच्या एमसीएच विंगचाही समावेश आहे. पंतप्रधान बीएचयूमध्ये १०० बेडसहीत एमसीएच विंग, गोदौलियात एक बहुस्तरीय पार्किंग, गंगा नदीत पर्यटनाच्या विकासासाठी रो-रो नौका तसेच वाराणसी-गाझीपूर महामार्गावर तीन लेनसहीत फ्लायओव्हर पूलसहीत वेगवेगळ्या सार्वजनिक योजनांचं उद्घाटन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *