Sat. Jan 22nd, 2022

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर खर्च झाले ‘इतके’ कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षांत मोठ्या प्रमाणावर विदेश दौरे केले. या विदेश दौऱ्यावर झालेला खर्चाचा आकडा समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ५ वर्षांच्या विदेश दौऱ्यावर तब्बल ४४६.५२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर एकूण किती खर्च झाला, असा प्रश्न करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर हे आकडे समोर आले आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या व्ही. मुरलीधर यांनी लेखी स्वरुपात ही माहिती दिली आहे.

वर्षनिहाय खर्च झालेला आकडा

२०१५-१६ – १२१.८५ कोटी.
२०१६-१७ – ७८.५२ कोटी.
२०१७-१८ – ९९.९० कोटी.
२०१८-१९ – १००.०२ कोटी.
२०१९-२० – ४६.२३ कोटी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *