Mon. Jan 17th, 2022

‘५५ वर्षात झाले नाही ते ५५ महिन्यात केले’ – पंतप्रधान

अवघ्या काही महिन्यांवरच लोकसभा निवडणुक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने केलेल्या कामाचा पाढा आज लोकसभेत वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी कॉंग्रेस सरकारवर घणाघाती टीकांचा वर्षाव केला. मोदींनी यावेळी अनेक मुद्यांवर भाषण केले आहे.

मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल –

विरोधक माझी बदनामी कराता तेव्हा देशाची बदनामी होत असते.

देशाची बदनामी होईल अशी टीका करू नका, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

लंडन येथे खोटी पत्रकार परिषद आयोजीत केल्याचा आरोप कॉंग्रेसवर लावला.

सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधक लष्कराचा अपमान करत आहेत.

कॉंग्रेसला सत्य ऐकण्याची सवय गेली आहे, यामुळे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सत्य बोलतात असे त्यांना वाटत नाही.

कॉंग्रेस फक्त ईव्हीएमच्या मुद्यावर बोलतात.

घटनात्मक संस्थांना नष्ट करण्याचाही आरोप आपल्यावर लावला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेस न्यायव्यवस्थेला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच 356 कलमाचा काँग्रेस सर्वाधिक दुरूपयोग करत असल्याचा आरोप लावला आहे.

योजना आयोगाला कॉंग्रेसने जोकरचा समूह म्हटलं आहे.

तसेच यावेळी नरेंद्र मोदींनी ५५ वर्षात झाले नाही ते ५५ महिन्याक केेले , अशी आठवण कॉंग्रेसला करून दिली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *