Thu. May 6th, 2021

#YogaDay2019 : पंतप्रधान मोदींमुळे जगाने योग स्वीकारला- मुख्यमंत्री

पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात 13 कोटी लोकांनी योगासनं केली. नांदेड येथे योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली. यावेळी जगभरात योगाचा प्रसार झाला आणि जगाने योग स्वीकारल्य़ाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं, तसंच या सर्वांचं श्रेय पंतप्रधानांना दिलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

आपल्या देशात योगासनांची प्राचीन परंपरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परंपरा जगभरात पोहचवण्याचं काम केलं.

भारतीय योगशास्त्राचा स्वीकार आज संपूर्ण जगाने केला आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झालं.

तसंच सर्वत्र योग पोहोचवण्यात बाबा रामदेव यांचा मोलाचा वाटा आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

#YogaDay2019 : नांदेड मध्ये मुख्यमंत्र्यांचा बाबा रामदेव यांंच्यासह योगा

नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांची योगासनं

बाबा रामदेव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनांना जागतिक स्तरावर पोहोचवल्याबद्दल कौतुक केलं. नांदेड येथील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *