Thu. May 6th, 2021

कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आज तीन महत्त्वाच्या बैठका

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी ऑनलाइन माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन काही उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९ वाजता कोविड-१९ च्या मुद्द्यावरुन बैठक घेणार आहेत. तसेच १० वाजता कोरोनासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निवारण पंतप्रधान करणार आहेत. तसेच दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान देशातील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात एक बैठक घेणार आहेत. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तसेच दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज तीन लाखांहून अधिक वाढ होत आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज तीन महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत.

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *