Wed. Dec 8th, 2021

भारतात ‘उघड्यावर’ बसणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटली- मोदी

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती भवनात एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता’ संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ही उपस्थित होते. मोदींनी देशातील 5 लाख गावे हे हागणदरीमुक्त झाल्याचा दावा केला. तर भारतात उघड्यावर बसणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटल्याचंही मोदींनी सांगितलं.

या संमेलनात पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता अभियान हे जगातील सर्वात मोठं स्वच्छता अभियान असल्याचं स्पष्ट केलं आहे. गांधीनी देखील स्वातंत्र्य आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले होते. परंतू स्वच्छतेच्या कामाबाबत सरकारी कार्यालयाची बाबूगिरी ऐवजी गांधीगिरी चालणार आसल्याचे मोदी म्हणाले.

भारतात 2014 मध्ये ग्रामीण स्वच्छतेचा आकडा 38 टक्के एवढा होता. आता तोच आकडा 94 टक्के झाला आहे. या 4 वर्षांत एवढा फरक पडला. भारतात 25 राज्य हे हागणदरीमुक्त झालेत. पूर्वी उघड्यावर शौच करणाऱ्यामध्ये भारतातील लोकसंख्येत 60 टक्के तर आता हीच संख्या 20 टक्क्यांनी घटलीय. मागील 4 वर्षांत शौचालयाची व्यवस्था नव्हती. परंतू आता बरीचशी मंडळी 90 टक्के शौचालयांचा नित्यनियमाने वापर करत आहे. लोकांनी त्यांच्या जून्या सवयींकडे वळू नये, याची आम्ही खबरदारी बाळगू, असे मोदींचे म्हणणे आहे. या स्वच्छता अभियानात जगभरातील 125 कोटी लोकांनी सहभागी घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

मोदींनी दिला 4-पी मंत्र
यावेळेस मोदींनी 4-पी मंत्र ही दिला. पार्टनरशीप, पीपल्स पार्टिसिपेशन, पॉलिटिकल लिडरशीप, पब्लिक फंडिंग, हे 4-पी मंत्रांमूळे स्वच्छता अभियान अधिक यशस्वी होणार. या 4 पी मंत्र सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मोदी म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *