Wed. Oct 27th, 2021

पंतप्रधान मोदींचा दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील दहा राज्यांमधील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच नाशिक, वर्धा, सांगली, कोल्हापूर, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीचा पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला.

‘कोरोना महमारीसारख्या संकटात आपली संवेदशीलता आणि धैर्यालाच सर्वात जास्त महत्व असते. आपल्याला जनसमान्यांपर्यंत जाऊन अधिक काम करत राहावं लागणार आहे. नवनवीन आव्हानात आपल्याला नवनवीन पद्धती आणि उपायांची आवश्यकता असते, त्यामुळे आपण आपले स्थानिक अनुभव एकमेकांना सांगावे. एक देश म्हणून आपण एकजुटीने काम करायला हवं’, असं मोदी यावेळी म्हणाले.

‘अनेक वेळा जेव्हा केसेस कमी होऊ लागतात, तेव्हा लोकांना वाटतं की आता काळजीचं कारण नाही, कोरोना आता गेला आहे. मात्र अनुभव वेगळाच आहे. तपासणी, सुरक्षित अंतर आदींबाबत लोकांमध्ये गांभीर्य कमी होऊ नये, यासाठी सरकारी तंत्र, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी या सगळ्यांमध्ये एका सामूहिक जबाबदारीचा भाव आपल्याला पक्का करायला हवा. यामुळे प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते’, असंदेखील यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *