Jaimaharashtra news

ममतादीदींची थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच – नरेंद्र मोदी

गेल्या काही दिवस मोदी आणि मायावतींमध्ये शाब्दिक खटके उडत आहेत. मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते. ममतादीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच आहे. असं म्हणत मोदींनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ममतादीदींनी अशीच थप्पड चिटफंडच्या नावाखाली गोरगरीबांच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्यांना द्यायला हवी होती. असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

मोदींचे ममतांना प्रत्युत्तर

मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते या वक्तव्यावर नरेंद्र मोदींनी ममतांना लक्ष केलं आहे.

ममतादीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच आहे. अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील पुरूलिया येथे प्रचारसभा घेतली.

या सभेदरम्यान त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे.


जय श्रीराम, जय मां काली, जय मां दुर्गाचा जयघोष करणाऱ्यांवर ममतादीदी संतापतात.

ममता दीदींकडून जयघोष करणाऱ्यांवर टीका केली जाते असे ही मोदी या सभेत म्हणाले आहेत.

ममतांनी ही़च थप्पड गोरगरिबांना लुटणाऱ्यांना लावली असती तर बरं झालं असतं. या शब्दात त्यांनी ममतांना उत्तर दिलं आहे.

Exit mobile version