Wed. May 19th, 2021

“मोदींनी पाकिस्तानशी चर्चा करावी” – राज ठाकरे

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्यामुळे युद्धापेक्षा पाकिस्तानशी चर्चा करावी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये असे आवाहन केले आहे. पाकिस्तानला जर चर्चा करायची असेल तर आधी त्यांनी पाऊल उचलायला हवे. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना त्वरीत भारतात पाठवले पाहिजे आणि सीमारेषेवर वारंवार होत असलेला गोळीबारही थांबवण्यात आले पाहिजे. त्यानंतरच मोदींनी संधी न सोडता पाकिस्तानशी चर्चा करावी असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करवी असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकात म्हटलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये.

पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे पाकिस्तानेच उचलायला हवं असंही त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानने वैमानिक अभिनंदन यांना भारतात परत पाठवावं.

सीमारेषेवरचा गोळीबार त्वरीत थांबवला पाहजे असे ते म्हणाले.

इम्रान खान यांनी या गोष्टी केल्या तर त्यांचे हेतू स्वच्छ आहेत.

पंतप्रधान मोदींनी ही संधी गमावता कामा नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *