Wed. Jun 26th, 2019

…म्हणून विरोधक ‘ईव्हीएम’ला ठरवतात व्हिलन – पंतप्रधान मोदी

0Shares

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आतापासूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी म्हणाले, विरोधकांनी लोकसभा निवडणुकी आधीच पराभवाचा बहाना शोधला आहे. विरोधक आतापासूनच ईव्हीएमवर सवाल करत आहेत.

शनिवारी कोलकात्याच्या परेड ग्राऊंडवर ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र घेऊन महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष केले. विरोधकांनी महाआघाडी केली आहे आणि आम्ही सुद्धा केली. त्यांनी इतर पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी केली आहे. मात्र आम्ही देशातील सव्वाशे करोड जनतेसोबत केली आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा कोणती आघाडी सर्वांत चांगली आहे, असा सवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या महामेळाव्यात मोठ्या नेत्यांची मुले उपस्थित होती. तसेच काहीजण असे देखील होते की आपल्या मुलाला किंवा मुलीला राजकारणात घुसवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याजवळ धनशक्ती आहे. मात्र आमच्याजवळ जनशक्ती आहे. विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक अनोखे बंधन आहे. हे बंधन नामदारांचे बंधन आहे. हे बंधन भाऊ-पुतण्या वाद, भ्रष्टाचार, घोटाळा, नकारात्मकता आणि असमानता यांचे गठबंधन आहे. हे एक अद्भुत संगम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: